महाराष्ट्रात पावसाने रौद्ररूप धारण करत मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांबरोबरच मुंबई, ठाणे परिसराला झोडपले आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांत मराठवाडा, मुंबई आणि राज्याच्या कोकण किनारपट्टी भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात उत्पन्न झालेले गुलाब चक्रीवादळ आता निवळलंय. चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागांत जाणवतोय.
#GulabCyclone #heavyrain #maharashtra