¡Sorpréndeme!

क्रेडिट – डेबिट कार्डांवरील ‘ऑटो डेबिट’ सुविधा संपुष्टात

2021-09-23 60 Dailymotion

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड तसेच नेटबँकिंगद्वारे ग्राहक उपयोगी सेवांची देयके, फोनचे रिचार्ज, विम्याचे हप्ते, डीटीएच आणि ओटीटी व्यासपीठांची वर्गणी यांसारख्या नियतकालिक आणि आवर्ती देयक व्यवहारांची ‘ऑटो डेबिट’नावाने ओळखली जाणारी सुविधा आता १ ऑक्टोबर २०२१ पासून बंद होणार आहे. आता त्यासाठी अतिरिक्त प्रमाणीकरण म्हणजेच प्रत्येक नूतनीकरणाच्या प्रसंगी ग्राहकांची संमती मिळविणे बँकांना अनिवार्य ठरेल. प्रत्येक व्यवहाराआधी ग्राहकांची पूर्वसंमती आणि ते ‘ओटीपी’द्वारे ग्राहकांकडून वैध ठरविले गेल्यासच व्यवहार पूर्ण होतील.

#ReserveBankofIndia #AutoDebit #DigitalBanking #Onlinepayment