¡Sorpréndeme!

Satara : उदयनराजे ‘ॲक्‍शन मोड’ मध्‍ये; नगरविकास आघाडीदेखील झाली सक्रिय

2021-09-22 1,695 Dailymotion

Satara : उदयनराजे ‘ॲक्‍शन मोड’ मध्‍ये; नगरविकास आघाडीदेखील झाली सक्रिय

Satara : आगामी निवडणुकीत सातारा (Satara) पालिकेची सत्ता हातात ठेवण्‍यासाठी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) सक्रिय झाले असून, त्‍यांनी शहरासह विस्‍तारित भागातील विकासकामांवर जोर दिलेला आहे. निवडणुकीतील गुलालासाठी उदयनराजे ‘ॲक्‍शन मोड’ मध्‍ये आल्‍याने सातारा (Satara) विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि समर्थक अंग झटकून कामाला लागले असून, येत्‍या काही दिवसांत आरोप-प्रत्‍यारोपांच्‍या फैरींमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. सातारा (Satara) पालिकेची सत्ता गत निवडणुकीत सातारा विकास आघाडीच्‍या माध्‍यमातून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी एकहाती मिळवली. या निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍या पत्‍नी वेदांतिकाराजे भोसले यांना पहिल्‍याच सार्वत्रिक निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. वेदांतिकाराजे यांच्‍या पराभवाचा वचपा येत्‍या निवडणुकीत काढण्‍याचा प्रयत्‍न आमदार गटाकडून होणार असून, त्‍याची तयारी त्‍यांनी सुरू केली आहे.

( व्हिडिओ : प्रमोद इंगळे)

#udayanrajebhosale #satara