भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आज चक्क बोट चालवत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. सातारा पालिकेच्या नगरविकास खात्याकडे प्रलंबित कामांसादर्भात ही भेट होती. कोयना धरणातील जलायशयामधून शिंदे यांच्या भेटीला जाताना उदयनराजेंनी बोटीचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेतले होते. शिंदे हे गणपतीनिमित्त त्यांच्या गावी आले असल्याने उदयनराजेंनी ही सदिच्छा भेट घेतली.
#udayanraje #boat #riding