¡Sorpréndeme!

चंद्राबाबू नायडूंनी स्वा सावरकरांना श्रद्धांजली वाहिली आणि नंतर ट्विट डिलीट केले, पण का ? | Lokmat

2021-09-13 83 Dailymotion

आज सावरकरांची पुण्यतिथी आहे. थोर स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकरजी यांना श्रद्धांजली अशा शब्दांमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी आपली भावना व्यक्त केली. त्यावर त्यांच्या फोलोअर्सनी देखील चांगला प्रतिसाद दिला होता.परंतु नंतर नायडूंनी सदर ट्विट डिलीट केल्याचे आढळले. नायडूंचा तेलगू देसम हा पक्ष रालोआचा घटकपक्ष आहे. मात्र, भाजपा व तेलगू देसम यांचे संबंध सध्या ताणलेले आहेत. भाजपा वापरत असलेला हिंदुत्व हा शब्द सावरकरांची देणगी आहे. एकंदरच सावरकरांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला ममत्व आहे. अशा भाजपाशी संबंध तणावाचे असल्यामुळे नायडूंनी ते ट्विट डिलीट केले असावे अशी चर्चा आहे. भाजपा सावरकरांना स्वातंत्र्यसैनिक मानते, परंतु काँग्रेससह अनेक विरोधक मानतात की भारताच्या स्वातंत्र्य चळवळी मध्ये सावरकरांचा सहभाग नव्हता.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews