¡Sorpréndeme!

'खेळात करिअर करा, नवनव्या संधी निर्माण होताहेत'; सचिन तेंडुलकरचा सल्ला

2021-09-13 0 Dailymotion

मुंबईः गेल्या काही वर्षांत सुरू झालेल्या लीग स्पर्धा या क्रीडा क्षेत्रासाठी खूपच फायद्याच्या आहेत. त्यामुळे मुलांनी फक्त क्रिकेटच असं नव्हे, तर कुठल्याही खेळाकडे करिअर म्हणून पाहायला हवं, असा सल्ला भारताचा विक्रमादित्य क्रिकेटवीर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज दिला. काही वर्षांपूर्वी पुरेशा संधी नसल्याने अनेक गुणवंत क्रीडापटू पुढे येऊ शकले नाहीत. देशासाठी खेळण्याची क्षमता असूनही त्यांना तिथवर पोहोचता आलं नाही. पण, आज क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बॅडमिंटन, टेबल टेनिस लीग आहेत आणि या स्पर्धांमध्ये खेळून कुणीही खेळाडू आपलं कुटुंब चालवू शकतो, ही खूप सकारात्मक गोष्ट असल्याचं सचिननं नमूद केलं. येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या टी-20 मुंबई लीगचा सचिन ब्रँड अॅम्बेसिडर आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews