¡Sorpréndeme!

आता उद्योजक महिला दाऊदच्या रडारवर? | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

दाऊद इब्राहिमच्या गँगने आता महिला उद्योजकांना धमकवायला सुरुवात केली आहे. यासाठी गँगमध्ये खास लेडीज विंगच सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दाऊदच्या गँगकडून आता थेट महिलांना धमकावूनही पैसे उकळले जात आहेत. यासाठी दाऊद इब्राहिमने गँगमध्ये खास महिलांची विंग तयार करण्यात आली आहे. महिला उद्योजकांना हेरून त्यांची संपूर्ण आर्थिक माहिती काढून ही माहिती या विंगकडून दाऊदला पुरवली जाते. छोटा शकीलच्या उस्मान नावाच्या गुंडाकडे महिला उद्योजकांना धमकवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सूत्र सांगतात. तपास यंत्रणांनी इंटरसेप्ट केलेल्या काही कॉल्सनुसार महिला टारगेट्सचा उल्लेख करण्यासाठी बेगम, क्वीनसारखे कोडवर्ड वापरले जात आहेत.
नुकतीच खार पोलीस ठाण्यात एका महिला उद्योजिकेने दाऊद आणि छोटा शकीलच्या काही गुंडांविरोधात तक्रार नोंदवली आहे. या महिला उद्योजिकेकडे दाऊद गँगने एक कोटींची खंडणी मागितली होती. तसेच न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या तक्रारीनंतर आता दाऊद आणि शकील गँगच्या सर्वच कारवायांवर बारीक नजर ठेवली जात आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews