¡Sorpréndeme!

अंड शाकाहारी की मांसाहारी? या वादावर वैज्ञानिकांचा आश्चर्यकारक खुलासा | Scientist News

2021-09-13 0 Dailymotion

आधी अंड की कोंबडी हा वाद जसा वर्षानुवर्ष चालतो तसाच अंड शाकाहारी की  मांसाहारी हा प्रश्नदेखील वादग्रस्त आहे. अनेक शाकाहारी लोकं अंड मांसाहारी आहे असं समजून त्याचा आहारातील समावेश टाळतात.त्यांना असं वाटतं जर कोंबडी अंड देते तर कोंबडी मांसाहारी म्हणजे अंडदेखील मांसाहारीच आहे. मग हा नियम दूधालाही लागू पडायला हवा. दूधही प्राणीच देतं ना ? 
अंड्यातून पिल्लू येतं  म्हणून तुम्ही त्याला मांसाहारी समजता. पण बाजारात मिळणारी अंडी ही अनफर्टीलाईजर आहेत. म्हणजे अशा अंड्यातून पिल्लू बाहेर येत नाही. त्यामुळे अंड्याला केवळ या कारणामुळे मांसाहारी समजणं चूक आहे. अंड्याला तीन लेअर असतात. पहिला लेअर हा कवच, दुसरा अंड्यातील पांढरा भाग आणि तिसरा म्हणजे पिवळा भाग. वैज्ञानिकांच्या शोधानुसार, अंड्यातील पांढरा भाग हा प्रोटीनयुक्त असतो. यामध्ये प्राण्याचा कोणताही समावेश नसतो. त्यामुळे वास्तवात अंड्यातील पांढरा भाग हा शाकाहारी असतो. .
पांढर्‍या भागाप्रमाणेच अंड्यातील पिवळा भागदेखील प्रोटीनप्रमाणेच कोलेस्टेरॉल आणि फॅट्स यांनी युक्त असतो.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews