¡Sorpréndeme!

सेल्फी स्टीकने खाजगी क्षण रेकॉर्ड करून महिलेला केले ब्लॅकमेल. तुम्ही ही व्हा सावधान.

2021-09-13 0 Dailymotion

सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजारी राहणा-या जोडप्याच्या खाजगी क्षणांना रेकॉर्ड करण्याचं प्रकरण पुण्यात समोर आलं आहे.
एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्लॅनिंग मॅनेजरवर हा आरोप लावण्यात आला असून तक्रार दाखल केल्यापासून तो फरार आहे.या घटनेचा खुलासा झाल्यानंतर 24 नोव्हेंबरला पीडित जोडप्याने हिंजेवाडी पोलीस स्टेशनमध्ये शेजारी कुंदन अश्ते विरोधात तक्रार दाखल केली. कुंदनने फोन कॅमेरा आणि सेल्फी स्टीकच्या मदतीने बेडरूममधील खाजगी क्षण रेकॉर्ड केले. तक्रारीनुसार, अश्तेने महिलेला तिची क्लिप पाठवली आणि ब्लॅकमेल करत त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितले. अश्तेने धमकी दिली की, तिने तसे केले नाही तर तो ती क्लिप सोशल मीडियात अपलोड करेल.  गेल्या आठवड्यात हे दोघे बेडरूममध्ये होते आणि तेव्हाच त्यांना खिडकीबाहेर काहीतरी विचित्र दिसले. ते खिडकीजवळ गेले असता त्यांना कुंदन फोन सेल्फी स्टीकवर लावून रेकॉर्ड करत असल्याचे दिसले. त्यानंतर सोसायटीच्या इतर सदस्यांना सोबत घेऊन तक्रारदारांनी कुंदनला याबाबत जाब विचारला तर त्याने तो गेल्या तीन महिन्यांपासून हे करत असल्याचं मान्य केलं.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews