साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी महिला आणि बालकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. यावेळी 'परराज्यांतून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून, जातात कुठे याची माहिती ठेवावी लागेल', असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी असे वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांविरोधात त्यांनी कांदिवलीच्या समतानगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
#atulbhatkhalkar #UddhavThackrey