आजवर ‘हॅरी पॉटर’, ‘गॉन गर्ल’, ‘साँग ऑफ आइस अॅण्ड फायर’, ‘द माउसट्रॅप’ यांसारख्या अनेक गाजलेल्या कथा, कादंबऱ्यांना दृष्यमाध्यमांत उतरवून सुपरहिट चित्रपट व मालिकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि अशाच यशस्वी प्रयोगांची पुनरावृत्ती करण्याचा निर्णय घेतलेल्या ‘अॅमेझॉन डॉट कॉम’ या कंपनीने ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या गाजलेल्या कथानकावर एक दूरदर्शन मालिका तयार करण्याची घोषणा केली आहे. ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ ही लेखक जे. आर. आर. टोल्किन यांनी तीन खंडात लिहिलेली लोकप्रिय काल्पनिक कादंबरी आहे. या कथानकावर याआधी पीटर जॅक्सन दिग्दर्शित अनुक्रमे ‘द फेलोशिप ऑफ द रिंग (2001)’, ‘द टू टॉवर्स (2002)’, ‘द रिटर्न ऑफ द किंग (2003)’ ही चित्रपट मालिका तयार करण्यात आली होती.3 अब्ज अमेरिकी डॉलर कमाई करणाऱ्या या चित्रपटांनी तब्बल 11 ऑस्कर पुरस्कारांवर नाव कोरले होते. आणि तोच यशस्वी फॉर्म्यूला पुन्हा एकदा आजमावण्याचा प्रयत्न अॅमेझॉनच्या वतीने करण्यात येत आहे. या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पुन्हा एकदा पीटर जॅक्सन यांच्यावरच सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांच्या मते ‘एचबीओ’ वाहिनीवर सुरू असलेल्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेने गेली अनेक र्वष प्रेक्षकांचे उत्तम प्रकारे मनोरंजन केले आहे. पण याव्यतिरिक्त अशी असंख्य लोकप्रिय कथानके आहेत ज्यांचा उत्तम वापर दूरचित्रवाणीवर करता येऊ शकतो. आणि याच हेतूने ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या कथानकात अॅमेझॉनने कोटय़वधींची गुंतवणूक केली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews