¡Sorpréndeme!

गणेशोत्सवानिमित्त फ्रँक्लीन पॉल या मुंबईकर भक्ताने साकारला अनोखा देखावा

2021-09-14 815 Dailymotion

मुंबईत पाणी साचण्याची ही समस्या लवकरात लवकर दूर व्हावी यासाठी एका गणेश भक्ताने बाप्पाकडे साकडे घातले आहे. आणि हे साकडं त्याने देखाव्याच्या रूपात मांडलं देखील आहे. मुंबईतील प्रतीक्षानगर येथे राहणार फ्रँक्लीन पॉल याने यंदा गणेशोत्सवासाठी एक अभिनव देखावा साकारला आहे. यात हिंदमाता परिसरात पावसामुळे साचलेले पाणी आणि त्यात अडकलेली वाहने असे दृश्य साकारण्यात आले आहे.