¡Sorpréndeme!

पहा कोण आहेत सुपरस्टार Rajinikanth चे गुरु ? | Rajinikanth Latest Updates | लोकमत मराठी न्यूज़

2021-09-13 0 Dailymotion

सुपरस्टार रजनीकांत म्हणजे प्रत्येक कलाकारासाठी दैवतच. यशाच्या शिखरावर असलेल्या रजनीकांत यांना अनेकांनीच गुरुस्थानी मानले आहे. पण, खुद्द रजनीकांत यांचे गुरु कोण, हे तुम्हाला माहितीये का? उत्तर भारतातील पर्वतरांगांमध्ये त्यांच्या गुरुचे स्थान असून, खुद्द रजनीकांत तेथे मानसिक शांतता आणि गुरुंची साधना करण्यासाठी जातात. उत्तराखंडमधील कुमाऊं भागातील अलमोरा जिल्ह्यात त्यांच्या गुरुंची गुहा आहे. महाअवतार बाबा असे त्यांच्या गुरुंचे नाव असून, त्यांच्या कार्याचा उल्लेख योगानंद परमहंस यांनी ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ या पुस्तकात केला आहे. दुनागिरी येथे समुद्रसपाटीपासून 5000 फूट उंचीवर असणाऱ्या पर्वतामध्ये ही गुहा असून, ‘योग सत्संग सोसायटी ऑफ इंडिया’तर्फे (YSS) त्या ठिकाणी देखरेख करण्यात येते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews