रत्नागिरीतील दापोली तालुक्यामधील आंजर्ले खाडीत भरकटलेल्या तीन खलाशांची एक नौका ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वाचवण्यात आली आहे. उसळत्या लाटांवर डोलणारी ही नौका कधीही बुडण्याची भीती होती. पण किनाऱ्यावर जमलेल्या ग्रामस्थांनी ती वाचवली.