अकोला - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईच्यावतीने आयोजित डॉ. लक्ष्मणराव देशपांडे एकांकिका स्पर्धेची विदर्भ विभागीय प्राथमिक फेरी अकोल्यातील श्री शिवाजी महाविद्यालयातील वसंत सभागृह येथे मंगळवारी घेण्यात आली. या स्पर्धेत अमरावती शाखेच्या चित्र-विचित्र नाटकाने सर्वाधिक पारितोषिक पटकावली. निर्मिती व दिग्दर्शनात चित्र-विचित्रने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.