शेतक-यांच्या प्रश्नांसाठी लढा देणा-या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीकडून सोमवारी (14 ऑगस्ट) राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. कर्जमाफीसहीत अन्य मागण्यासाठी समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी वर्धा व अहमदनगरमधील शेतक-यांनी सुकाणू समितीच्या आंदोलनात सहभाग नोंदवत सरकारचा तीव्र निषेध नोंदवला.