नाशिकमधील ध्वनी प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी शहर पोलिसांनी प्रत्येक आठवड्यात सोमवारी ‘नो हॉन डे’ साजरा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. दरम्यान, ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी तेथील स्थानिकांनी सोनू तुझा हॉर्नवर कंट्रोल नाय काय?, असे गाणेदेखील तयार केले आहे.