जिल्ह्याचे सांस्कृतिक सभागृह व्हावे या मागणीसाठी सामाजिक, सांस्कृतिक, संगीत, साहित्य आदी क्षेत्रातील कलावंतांनी गुरुवारी विकास भवनासमोर धरणे आंदोलन केले. कलात्मक पद्धतीने पार पडलेल्या धरणे आंदोलनात निदर्शने न करता नाट्यपदांचे सादरीकरण करण्यात आले.