मालेगाव (वाशिम) : शहर तसेच तालुक्यातील विविध विठ्ठल मंदिरात लोकांनी सकाळपासूनच भाविकांनी एकच गर्दी करुन विठुरायांचे दर्शन घेतले. नाथनगरी डव्हा येथे दशर्नासाठी आलेल्या भाविकांची गर्दी पाहता संस्थानाच्यावतीने कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वांना एका रांगेत दर्शनाची व्यवस्था केली होती. तसेच, भाविकांना साबूदाणाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले.