¡Sorpréndeme!

तब्बल दहा तासानंतर औंधचा गजराज ट्रकमध्ये चढला

2021-09-13 0 Dailymotion

औंध : औंध संस्थानच्या गजराज हत्तीस नेण्यासाठी मथुरा केअर सेंटरमधून खास गाडी आली खरी, परंतु यात हा हत्ती चढलाच नाही. अखेर त्याच्यासाठी नेहमी मागविण्यात येणारा स्थानिक ट्रक आल्यानंतरच तो त्यात चढला.
76 वर्षांचा गजराज औंधमधून हलवावा, म्हणून 'पेटा' या संस्थेने जोर लावला होता. अखेर त्यांच्या मागणीला मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या आठवड्यातच 'पेटा'ची टीम आली होती. परंतु या गजराजवर जिवापाड प्रेम करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केल्याने हत्तीचं प्रस्थान पुढं ढकललं गेलं होतं.