अकोला : मोठ्या प्रतीक्षेनंतर १३ जून रोजी राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अकोला जिल्ह्याचा निकाल ८४.०२ टक्के लागला आहे. टक्केवारीत याहीवर्षी मुलींनीच आघाडी घेतली आहे. ८६.५ टक्के प्राप्त करू न पातूर तालुका निकालात जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. निकाल जाहीर होताच भारत विद्यालय, विवेकानंद शाळा व बाल शिवाजी हायस्कुलमध्ये विद्यार्थींनींनी एकच जल्लोष केला.