¡Sorpréndeme!

कारागिराने बनवली अनोखी स्पोर्ट्स बाईक

2021-09-13 0 Dailymotion

औरंगाबाद : औरंगाबादेत शेख शाहेद शेख हमीद या तरुण दुचाकी कारागिराने बनवलेली स्पोर्ट्स बाईक सध्या कुतूहलाचा विषय बनला आहे. दीड महिना परिश्रम घेत शेख शाहेदने मोपेड दुचाकीचे स्पोर्ट्स बाईकमध्ये रुपांतर केले आहे. ताशी ९० कि. मी. च्या गतीने ही स्पोर्ट्स बाईक धावते. विशेष म्हणजे दिवसभर गॅरेजमध्ये काम करून रात्रीच्या वेळी ही अनोखी स्पोर्ट्स बाईक बनवली. रस्त्यावरून ही दुचाकी धावताना प्रत्येक ती पाहण्यात क्षणभर हरवून जात आहे. ( व्हिडिओ : संतोष हिरेमठ )