वर्धा - सरकारच्या अस्पष्ट धोरणामुळे तूर खरेदी रखडत सुरु आहे. सध्या बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत तूर खरेदी सुरु आहे. मात्र, तोकड्या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना 10 ते 15 दिवस मुक्काम करावा लागत आहे. यादरम्यान, बुधवारी (दि.31) पाऊस आल्याने सुमारे 2 ते 3 हजार क्विंटल तूर भिजली.