गोंदिया : गोंदियाजवळील बिरसी विमानतळावर असलेल्या राष्ट्रीय उड्डान प्रशिक्षण संस्थेचे (एनएफटीआय) प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील वैनगंगा नदीत कोसळले. यात प्रशिक्षक व शिकाऊ पायलट तरुणी ठार झाले.