मुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई मनपाने कायम सेवेत घेण्याची मागणी करत मुंबईतील कंत्राटी सफाई कामगारांनी पालिका मुख्यालयाला घेराव घातला. तसेच, कामावर रुजू होण्याचे पत्र द्या आणि गेल्या दीड वर्षांतील थकबाकी देण्याची कामगारांची मागणी केली. यावेळी प्रत्येक कामगार अर्ज घेऊन मुख्यालयावर धडकल्याने अर्ज स्विकारण्यासाठी पालिका प्रशासनाची भंबाळी उडाली.
(व्हिडिओ - सुशील कदम)