राजूरा (वाशिम) - मालेगाव तालुक्यातील खैरखेडा येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने महिलांना दूरवरून नदी-नाल्यातील दूषित पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. टँकरग्रस्त गाव म्हणून खैरखेडा परिचित आहे. येथील पाणी समस्या कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्प राबविण्यात आली. मात्र, या प्रकल्पातील विहिरीला पाणीच लागले नाही. सद्यस्थितीत एक किमी अंतरावरील गाव तलावातील गढूळ पाणी आणावे लागत आहे. नदीपात्रात छोटे छोटे झरे खोदून तेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. (व्हिडिओ - यशवंत हिवराळे)