वाशिम : स्थानिक इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने २३ मार्च पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपाला केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचा सुध्दा समर्थन मिळाले आहे .डॉक्टरांवर झालेल्या मारहाणी प्रकरण तसेच काही डॉक्टरांवर निलंबनाची करण्यात आलेली कारवाईच्या निषेधार्थ सदर बेमुदत संप पुकरण्यात आला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी यांना निवेदन देवून न्यायाची मागणी केली आहे.