कोल्हापूर - अन्याय झाला की त्याविरोधात संघर्ष करायचा हा कोल्हापूरच्या मातीचाच गुण आहे, या गुणाचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले असून या जिल्ह्यातील नऊ शेतकऱ्यांनी एका बलाढ्य ट्रॅक्टर कंपनीबरोबर तब्बल वीस वर्षे संघर्ष करून आपल्या घामाचे दाम परत मिळविण्यात यश मिळविले. याबाबत आलेला अनुभव सांगताना शेतकरी चंद्रकांत बाबूराव जाधव.