यवतमाळ : डोंगर खर्डा जिल्हा परिषद गटात उमेद्वार कडून पैशाचे वाटप करण्यात आल्याचे एका व्हिडिओमधून समोर आले आहे. अंतरगाव पालोती गावात शिवसेनेचे उमेदवार विजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांनी पैशाचे वाटप केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. विजय राठोड हे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचे भाऊ असून, या प्रकाराविरोधात कळंब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.