नाशिक- गंगापूर रोड वरील बाळासाहेब ठाकरे स्मारक तथा ऐतिहासिक संग्रहालय नाशिककरांसाठी खुले झाले आहे. या संग्रहालयाच्या रुपाने नाशिक शहरात पर्यटकांना काही नवीन माहिती मिळणार आहे. शिवकालीन इतिहासाच्या आठवणी संग्रहल्यायच्या भेटीत ताज्या होतात. बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्याकडे असलेल्या संग्रही तलवारी संग्रहालयाला भेट दिल्या आहेत.