नाशिक : प्रबोधनपर संदेशांची सोशल मिडियावरून देवाणघेवाण करत लोकांनाच ब्रम्हज्ञान शिकविणाऱ्यांची संख्या कमी नाही; मात्र आपल्या शहराचे पर्यावरण जपण्यासाठी जीवनशैली बदलण्याचे किंवा एखादा उपक्रम हाती घेण्याचे धाडस काही ध्येयवेडे अपवादानेच करतात. नाशिकमध्ये अशाच एक कृतीशिल पर्यावरणप्रेमी ध्येयवेड्याच्या आपलं पर्यावरण संस्थेने २०१५ साली एक धाडस केलं. ते धाडस होतं एकाच दिवशी नागरिकांच्या हाताने दहा हजार रोपे लावण्याचं.