नाशिक - शालिमार पेंट कंपनीला भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या गाड्या दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. ही आग कंपनीच्या मुख्य प्लांटला लागली असून यात मोठ्या प्रमाणात रसायन असल्याने लगतच्या गोंदे गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टींने गावालगतच्या डोंगरावर हलविण्यात आले आहे.