एक हजार आणि पाचशेच्या चलनी नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर शहरासह राज्यातील पोस्ट आॅफीसमध्ये रक्कम ठेव म्हणून जमा करण्याचा ओघ कमालिचा वाढला आहे. दरम्यान, पती राजांपासून लपविलेल्या लक्षावधी रुपयांचाही बचत आणि आवर्ती ठेव म्हणून जमा करण्याचा प्रयत्न महिला वर्गाकडून गेल्या जात आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांमध्ये खामगाव पोस्ट आॅफीसमध्ये तब्बल एक कोटी ६६ लक्ष ८० हजार ९०८ रुपयांची ठेव जमा झाली आहे.