कऱ्हाड (सातारा) : सुपने हे कुस्तीची परंपरा जपणारे सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील गाव आहे. त्या गावातील मल्लांसाठी अद्यावत कुस्ती केंद्र, क्रीडा संकुल सुरु करावे या मागणीसाठी सुपनेतील सत्ताधारी आणि विरोधक मंडळी पाच वर्षानंतर मतभेद विसरुन एकत्र आली. त्यांनी सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांना संकुलासाठी साकडे घालुन निधीची मागणी केली. त्याला प्रतिसाद देत दोन्ही नेत्यांनी मदतीची ग्वाहीही दिली आहे. (व्हिडिओ : हेमंत पवार)
#kusticentre #kustikendra #kusti
#satara #sataranews #sataralivenews #sataraupdates #sataranews