¡Sorpréndeme!

टोक्यो पॅरालीम्पिक । नेमबाजी आणि बॅडमिंटन मध्ये भारताला दुहेरी पदक

2021-09-04 246 Dailymotion

टोक्यो पॅरालीम्पिकमध्ये भारताचे खेळाडू अभूतपूर्व कामगिरी करताना दिसत आहेत. आज ४ सप्टेंबरला नेमबाजी आणि बॅडमिंटन या प्रकारांत खेळाडूंनी डबल धमाका केला आहे. नेमबाजीमध्ये मनीष नरवाल याने सुवर्ण आणि सिंहराज अधानाने रौप्य पदक पटकावलं. तर बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगतने सुवर्ण पदक आणि मनोज सरकारने कांस्यपदक मिळवलंय. एकाच प्रकारात दोन पदके मिळवून केलेल्या डबल धमाक्यांमुळे भारतीयांचा शनिवार शानदार झाला आहे.

India #TokyoParalympics2020 #Shooting #Paralympics