Yavatmal : यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस
Yavatmal : गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळी अकरा वाजता दरम्यान आकाशात काळे कुट्ट ढग दाटून आले. त्यानंतर मुसळधार पाऊस कोसळू लागल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. पावसाचा जोर अधिक असल्याने कामावर जाणाऱ्यांना दुकानात आडोसा शोधावा लागला. रस्त्यावर केवळ चारचाकी वाहने धावताना दिसली.
#Yavatmal