Barshi (Solapur) : दोन तालुक्यांना जोडणाऱ्या श्रीपतपिंपरीच्या पुलावरून वाहतेय पाणी!
Barshi (Solapur) : श्रीपतपिंपरी (Barshi) गावाच्या अलीकडे असणाऱ्या, Barshi अन् माढा तालुक्याला जोडणाऱ्या ओढ्याच्या पुलावरून मागील पंधरा दिवसांपासून पाणी वाहत असून, ग्रामस्थ व प्रवाशांचे पुलावरील पाण्यातून दळण-वळण सुरू आहे. पुलाला कठडे अथवा अँगलचे गार्ड नसल्याने जीव मुठीत घेऊन सर्वजण जाताना दिसत आहेत. पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. तालुक्यातील कुसळंब, बार्शीतील घोर ओढा, कासारवाडी, कोरफळे, अलीपूर, खांडवी येथील लहान-मोठ्या ओढ्यांतून पाणी श्रीपतपिंपरी येथील ओढ्याला येत असल्याने ओढा वर्षातील आठ महिने वाहत असतो.
(बातमीदार व व्हिडिओ : प्रशांत काळे)
#Barshi #solapur