¡Sorpréndeme!

Rajura (Chandrapur) : नागरिकांचे चक्काजाम आंदोलन; ढोल-ताशे वाजवून केले मुंडण

2021-09-02 633 Dailymotion

Rajura (Chandrapur) : नागरिकांचे चक्काजाम आंदोलन; ढोल-ताशे वाजवून केले मुंडण

Rajura (Chandrapur) : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत गोवरी डीप कोळसा खदान इथून सास्ती रेल्वे पॉइंट जवळ दररोज ओव्हरलोड कोळसा वाहतूक होत असल्याने मार्गावरील जनजीवन प्रभावित झालेले आहे. दररोज २५० ओव्हरलोड ट्रक या मार्गावरून धावतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. निवेदन देऊनही अवजड वाहतूक बंद झाली नसल्यामुळे नागरिकांनी गुरुवारी गोवरी येथे चक्काजाम आंदोलन केले. ढोल ताशाच्या नादात नागरिकांनी चक्काजाम केला व वेकोलि प्रशासनाच्या निषेधार्थ मुंडण करून जाहीर निषेध नोंदविला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त होता.

Video : आनंद चलाख - श्रीकृष्ण गोरे

सकाळ वृत्तसेवा

#rajura #Chandrapur