खंडाळा (सातारा) : सातारा-पुणे महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडताच पहिल्याच वळणावर भरधाव वेगात जाणारा तेलाचा ट्रक पलटी झाल्याने दोघेजण किरकोळ जखमी झाले. मात्र, अपघातामुळे महामार्गावर सर्वत्र गोडेतेल सांडल्याने महामार्गावरुन जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागत होते. हुबळी (कर्नाटक) वरुन पुणे येथे गोडेतेल घेऊन भरधाव वेगात जाणारा मालट्रक (गाडीक्रमांक केए 01.एके.4514 ) आज सकाळी सात वाजता पलटी झाला. या अपघातात चालक सुलेमान शरीफ साहब नदाफ (वय 25 ) व क्लिनर शिवराज बसय्या करडीमळ (वय 35 ) दोघेही रा. हुबळी कर्नाटक हे किरकोळ जखमी झाले. (व्हिडिओ : अशपाक पटेल)
#khandala #satara #khandalasatarahighway #satara #sataranews #khandalanews