२५ डिसेंबर रोजी इंग्रजी वर्षातील शेवटची एकादशी आहे, ती म्हणजे मोक्षदा एकादशी! मार्गशीर्ष मास केशव मास म्हणून ओळखला जातो. म्हणून या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केली जाते. हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्त्व असते. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. अधिक मास आल्यास त्यात आणखी दोन एकादशींची भर पडून त्या २६ होतात. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. मोक्ष प्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असते. मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे, म्हणून काही ठिकाणी ती वैकुंठ एकादशीही म्हटली जाते. नरदेहातून सुटका झाल्यावर आत्म्याला मोक्ष मिळावा, म्हणून यादिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते.पण मोक्षदा एकादशी वेगळी आणि विशेष का? जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -
#Lokmatbhakti #MokshadaEkadashi #मोक्षदाएकादशी
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा