दहिवडी (सातारा) : येथे माण तालुका शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांनी मोर्चाने जावून उपजिल्हाप्रमुख संजय भोसले व तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी यांच्या उपस्थितीत सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना निवेदन दिले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नारायण राणे यांच्या छायाचित्राला जोडेमार आंदोलन केले. (व्हिडिओ : रुपेश कदम)
#narayanrane #uddhavthackeray #shivsena #bjp