Chandgad (Kolhapur) : 22 वर्ष गणेश मूर्ती घरीच साकारणारा अवलिया
Chandgad (Kolhapur) : गणेश चतुर्थीचा सण अवघ्या वीस दिवसावर येऊन ठेपला आहे. कुंभारवाड्यांमध्ये मूर्ती साकारण्याची लगबग सुरू आहे. मूर्ती तयार करणे ही कुंभार समाजाची पारंपारिक कला. मात्र या समाजा बाहेरील काही लोकांनी सुद्धा ही कला जोपासली आहे. चंदगड (Chandgad) शहरातील डॉ. आर. एन. गावडे गेली २२ वर्षं घरची मूर्ती स्वतः बनवत आहेत. बावीस वर्षांपूर्वी कुंभाराने अचानकपणे मूर्ती बनवता येत नसल्याचे सांगितले आणि उपजत कला गुण असलेल्या डॉक्टरांनी घरची मूर्ती स्वतः साकारली. त्यावेळेपासून दरवर्षी ते मूर्ती बनवत आहेत.
Video : सुनील कोंडुसकर, चंदगड.
#chandgad #kolhapur