¡Sorpréndeme!

Bullock cart race :नगर-मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको

2021-08-11 534 Dailymotion

Bullock cart race :नगर-मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
राहुरी (जि.अहमदनगर) (Ahmednagar): बैलगाडा शर्यतीला (Bullock cart race)परवानगी द्यावी. या मागणीसाठी बुधवारी (ता.११) राहुरी बाजार समिती समोर शेकडो शेतकऱ्यांनी (farmer) बैलांसह रस्त्यावर उतरून, नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. राहुरी शहरात नगर-मनमाड महामार्गावर बैलांची सवाद्य मिरवणूक काढून, भंडारा उधळीत "पेटा हटवा. बैल वाचवा" अशा घोषणा देऊन, शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर ठिय्या दिला. जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, रवींद्र हापसे, प्रशांत शिंदे, बाळासाहेब जाधव, महेश लांबे आदींसह शेतकरी उपस्थित होते. (व्हिडिओ - विलास कुलकर्णी)
#Bullockcartrace #Rahuri #Ahmednagar #Farmer #Maharashtra #SwabhimaniShetkariSanghatana