केंद्रात अमितशहा सहकार मंत्री झाले, आणि राज्यातल्या साखर कारखानदारीशी जोडले गेले त्या प्रत्येकाची झोप उडाली. ज्यांच्या शब्दावर महाराष्ट्राचे राजकारण चालते, त्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांना देखील अमितशहाच्या ‘सहकार निवडीच्या विषयावर बोलावे लागले. राज्यातले अनेक साखर कारखाने एडीच्या रडारवर आहेत, केंद्रातल्या सरकारला राज्य सरकारची कोंडी करायची आहे. याचा परिणाम शेतकरी, कामगार राज्यातल्या राजकारणावर थेटपणे होणार आहे.
राज्यासह, कोल्हापुरात ऊस छान आलाय. पण तो ऊस यंदा साखर कारखाण्यापर्यंत जाईल की, नाही याची शाश्वती नाही. या एकूणच परिस्थीचा सकाळचे संपादक संदीप काळे यांनी घेतलेला हा आढावा.
#AmitShah #SahakarMantri #Sugercane #SugercaneFarm #SakalMedia #Farmer #CooperationMinister