Tokyo Olympics 2020 : ऑलिंपियन प्रवीण जाधव यांनी जिल्ह्याचा गौरव वाढविला
Satara : टोकियो ऑलिंपिक २०२० करिता धनुर्विद्या खेळाच्या भारतीय संघामध्ये सरडे (ता. फलटण) येथील प्रवीण रमेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘‘अथक परिश्रमामुळे व प्रोत्साहनामुळेच प्रवीण जाधव यांनी उच्चतम कामगिरी करून जिल्ह्याचा गौरव संपूर्ण देशामध्ये वाढविला आहे. त्यांच्या अडीअडचणीबाबत संपूर्ण सहकार्य करण्यात येईल.’’ टोकियो ऑलिंपिक २०२० करिता निवड झालेल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन प्रवीण जाधव यांचे पालक व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
#pravinjadhav #archer #satara