12 जुलै म्हणजेच 'पानशेत प्रलय दिन'. पानशेत धरणफुटीच्या घडनेला तब्बल 60 वर्ष होत आहेत. पुण्याच्या इतिहासातील मोठ्या आपत्तींपैकी एक मानली जाणारी आपत्ती म्हणजे पानशेत धरणफुटी. 1960 साली धरण फुटले आणि मुठा नदी काठच्या पेठांमध्ये हाहाकार माजला. या पुरामुळे अनेक घरे, इमारती, माणसे, जनावरे, आसपासची शेत्ती, सार्वजनिक मालमत्ता मंदिरं, शनिवार वाडा यांचे अतोनात नुकसान झाले. ही आपत्ती होती की इष्टापती? अशी चर्चाही होते. कारण, ह्या पुरानंतर पुण्याचा चेहरामोहराच बदलला. नदीच्या आसपासच्या पेठा विस्थापित होत विखूरल्या...आधूनिक पुणे विस्तारत गेले. कित्येकांचे पुनर्वसन झाले. अद्यापही कित्येकाच्या पुनर्वसनाचा प्रश्न बाकी आहे. पाणशेत पुर आला त्यावेळी नक्की काय घडले? हे धरण का आणि कसे फुटले? याचा शोध घेणारी ''12 जुलै 1961'' ही काल्पनिक कांदबरी लेखिका आश्लेषा महाजन यांनी लिहिली आहे. काल्पनिक पात्रांमार्फत पानशेत पुरासंबधी काही धागेदोरे शोधत कथा या दुर्घटनेच्या मुळाशी पोहचते. पानशेत दुर्घटनेच्या 60 व्या स्मरणवर्षी म्हणजेच 12 जुलै 2021 ला हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जाणून घेऊ या या पुस्तकाबाबत काय म्हणतायेत लेखिका आश्लेषा महाजन
#AshleshaMahajan #Novel #NovelonPanshetDamFlood #12July1961 #SakalMedia