राज्य सरकारचा आदेश झुगारून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेले ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर "पांडुरंगाच्या भक्तांचा छळ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना महापूजेचा नैतिक अधिकार नाही", असं भाजप आध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी म्हटलंय.
#TusharBhosale #BJP