११ मे रोजी ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली असून नागपूरसह वरळीच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. कोणत्याही तपास यंत्रणा स्वायत्त असून त्या त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. त्यामुळे केंद्रातील सरकार आणि अनिल देशमुखांवरील कारवाईचा संबंध लावणे अर्थहीन असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
#PravinDarekar #AnilDeshmukh #ED
It makes no sense to link the action against the central government and Anil Deshmukh