¡Sorpréndeme!

अभय बंग हे महान आहेत, त्यांच्या मुळे महाराष्ट्र व्यसनमुक्त झालेला आहे - वडेट्टीवार

2021-06-13 893 Dailymotion

राज्य सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यात आल्यानंतर, अभय बंग यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, “अभय बंग हे महान जगव्यापी समाजसुधारक आहेत ते महान आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्र व्यसनमुक्त झाला आहे. एकही माणूस गडचिरोली जिल्ह्यात तंबाखू खात नाही, सिगारेट पीत नाही, दारू पीत नाही एवढं महान कार्य त्याचं आहे. त्यामुळे त्यांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे.” तसेच यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील अनेक घडामोडीवर भाष्य देखील केले.