¡Sorpréndeme!

लावलेले निर्बंध पाळावेच लागतील अन्यथा लॉकडाऊन लावावा लागेल, राजेश टोपे यांचा ईशारा

2021-06-12 0 Dailymotion

गेल्या महिनाभरात राज्यात कोरोना बाधितांची आकडेवारी थक्क करणारी आहे.,अनेक जिल्ह्यात निर्बंध लाऊनही लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येत १० टक्के वाढ होत असून ही वाढ चिंताजनक असल्याचं सांगत आपण लॉकडाऊनकडे वाटचाल करत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.आज मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक झाली असून कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याबाबत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितलं.कुठल्याही परिस्थितीत लोकांना निर्बध पाळावेच लागतील अन्यथा लॉकडाऊन लावावाच लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग असता आणखी वाढवणार असून लसीकरणाच्या प्रमाणात केंद्राने लसींचा पुरवठा करावा अशी मागणीही त्यांनी केलीय.यापुढे कोरोनाचे थोडेही लक्षणं आढळल्यास नागरीकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन करत यानंतर कोरोना बाधित रुग्णाला होम आयसोलेशनमध्ये ठेवलं जाणार नाही,कोविड रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील असंही सांगितलं.जिल्ह्या-जिल्ह्यात कोरोनाची काय परिस्थिती आहे.हे त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पाठवायचं असून त्यांच्या परवानगीनंतरच लॉकडाऊन लावायचा असा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याचं देखील टोपे म्हणाले.लसीकरण करण्यात महाराष्ट देशात एक नंबरला असून राज्य लसीकरणात कुठेही कमी पडत नसल्याचं सांगून कोरोना लसीकरणासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यचा निंर्णय झाल्याचं देखील टोपे यांनी सांगितल.राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध आणि लॉकडाऊन लावण्यात आले असून हे चुकीचं असल्याचं सांगत शास्स्ट्रोक्त पद्धतीने लॉकडाऊन असायला हवा असं मतही त्यांनी व्यक्त केलं.राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​